Wednesday , June 7 2023
Breaking News

नेरळ रेल्वे स्थानकातील लिफ्टचे काम पूर्ण

सुविधा कार्यान्वित करण्याची मागणी

कर्जत : बातमीदार

मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे या मार्गावरील नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी लिफ्टची सोय करावी अशी मागणी होत होती. त्यामुळे रेल्वे बोर्डने नेरळ रेल्वे स्थानकात उदवाहनची व्यवस्था करण्याची मागणी पूर्ण केली आहे. नेरळ रेल्वे स्थानकातील उदवाहनचे काम पूर्ण झाले असून आता ती सुविधा कधी कार्यान्वित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे तर नेरळ स्थानकात सरकते जिने कधी अस्तित्वात येणार ही मागणी प्रवाशांनी केली असून त्याची पूर्तता करावी, अशी मागणी होत आहे.

नेरळ रेल्वे स्थानकात नवीन पादचारी पुलाची निर्मिती झाल्यांनतर त्याची उंची पाहून सर्वांची दमछाक होत होती. तब्बल 47 पायर्‍या एका बाजूला असलेल्या त्या पादचारी पुलाबाबत सतत तक्रारी येत होत्या. त्यानंतर स्थानिकांनी उदवाहन आणि सरकते जिनेउभारण्याची मागणी केली होती. त्यानुसार नेरळ स्थानकात उदवाहन उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. आता नेरळ स्थानकात फलाट दोनवर उभारलेल्या उदवाहनचे लोकार्पण लवकर व्हावे अशी मागणी नेरळ रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष संदीप म्हसकर यांनी आहे. त्याचवेळी फलाट दोनवर उदवाहन उभारल्यानंतर फलाट एक वर पादचारी पूल पार करताना लागणार्‍या 47 पायर्‍यांचा चढाव ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी आणि महिला प्रवासी यांच्यासाठी दमछाक करणारा ठरत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सरकते जिने बसविण्याची मागणी रेल्वे प्रवासी सातत्याने करत असतात.

नेरळ प्रवासी संघटनेने नेरळ स्थानकात प्रवाशांसाठी निवारा शेड, फलाट एक वर स्वच्छता गृह तसेच कर्जत एन्डकडे पादचारी पूल आणि फलाट एकवरील तिकीट खिडकी दिवसभर सुरू ठेवण्याची मागणी केली जात आहे, मात्र प्रवाशांची पादचारी पूल करताना सुरू असलेली दमछाक कमी करण्यासाठी काम पूर्ण केलेल्या उदवाहन बद्दल रेल्वे प्रवासी संघटनेने रेल्वे बोर्डचे आभार मानले आहेत.

Check Also

जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी भाजपच्या चार जणांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने रायगड जिल्हा परिषद नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी …

Leave a Reply