Wednesday , June 7 2023
Breaking News

‘अवकाळी’मुळे पांढरा कांद्यावर परिणाम; उत्पादनात 50 टक्के घट

अलिबाग : रामप्रहर वृत्त

अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण, उष्ण, दमट, थंड अशा वातावरणामुळे पांढर्‍या कांद्याच्या लागवडीमध्ये करपा रोग श्रीप्स तसेच किडीचा रोग अशा विविध समस्येने या वर्षी शेतकर्‍यांच्या 50 टक्के उत्पादनात घट झाली आहे.

अलिबाग तालुक्यातील प्रगतशील शेतकरी सतिश म्हात्रे व रंजन म्हात्रे यांनी निसर्गाच्या अनेक समस्यांवर मात करून कठोर परिश्रम व सातत्याने मेहनत घेवुन शासनाच्या कृषी अधिक्षक रायगड जिल्हा व सर्व कृषी अधिकारी तसेच सृष्टी ग्रोचे प्रधान सर तसेच रोहा येथील शास्त्रज्ञ जितेंद्र कदम व त्यांचे सहकार्याचे मार्गदर्शन लाभल्याने सुमारे 50 खंडी पांढर्‍या कांद्याचे उत्पादन यशस्वी झाले आहे.

पांढर्‍या कांद्याचे लागवड, बेणणी, काढणी, माला बांधणे तसेच खते, औषधे, मजुर वर्ग, देखभाल व मार्केटींग याकरीता सुमारे तीन एकर शेतजमिनीत पांढरा कांदा उत्पादन घेण्यासाठी सुमारे चार लाख रुपये खर्च आला आहे. तरीही अभ्यासपुर्वक कुशल प्रयत्नाने चार ते पाच लाख रुपये निव्वळ नफा मिळणे उपेक्षित आहे. महत्त्वाचे म्हणजे पांढर्‍या कांद्याची लागवड नोव्हेंबर ते मार्च पर्यत अनेक महिला वर्गाला रोजगाराची संधी निर्माण झाली त्यामुळे महिला वर्गात समाधनाचे वातावरण आहे तसेच पांढर्‍या कांद्याची वाढती मागणी लक्षात घेता यावर्षी मुंबई, नवी मुंबई, रायगड जिल्हा, पुणे, कल्याण, डोंबिवली आदि परिसरात पांढर्‍या कांदयाला जोरदार मागणी असुन मालाचा पुरवठा केला जात आहे.

बदलते हवामान अवकाळी पाऊस यामुळे अलिबाग तालुक्यातील पांढर्‍या कांद्याचा उत्पादन घेणारा शेतकरी हतबल झाला आहे. तसेच शेतकरी वर्गाला दिलासा देण्यासाठी व त्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी सहानभुती पुर्वक विचार करणे गरजेचे आहे.

Check Also

जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी भाजपच्या चार जणांची नियुक्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने रायगड जिल्हा परिषद नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी …

Leave a Reply