Breaking News

प्रो कबड्डी लीग : पाटणा पायरेट्सची सेमीफायनलमध्ये धडक

बंगळुरू ः वृत्तसंस्था

प्रो कबड्डी लीगमध्ये पाटणा पायरेट्स संघाने तेलुगू टायटन्सचा 38-30 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. पाटणाचा 19 सामन्यांमधील हा 14वा आणि स्पर्धेतील सलग सहावा विजय आहे. दुसरीकडे तेलुगू टायटन्सचा 20 सामन्यांमधील हा 15वा पराभव आहे. पहिल्या हाफनंतर पाटणा पायरेट्स 21-20 असा पुढे होता. पाटणाने सातव्या मिनिटालाच तेलुगू टायटन्सला ऑलआऊट केले. यानंतर टायटन्सने जबरदस्त पुनरागमन केले आणि 18व्या मिनिटाला पाटणाला ऑलआऊट करत सामन्यात आघाडी घेतली, मात्र पुढच्या दोन मिनिटांत पाटणाने पुन्हा दोन गुणांसह सामन्यात आघाडी घेतली. दुसर्‍या हाफच्या सुरुवातीला सचिनने सुपर 10 पूर्ण केला. मोक्याच्या वेळी तेलुगू टायटन्सने 27-26 अशी आघाडी घेतली. ब्रेकनंतर पाटणाने सलग गुणांसह आघाडी घेतली आणि त्यानंतर शेवटच्या 10 मिनिटांत तेलुगू टायटन्सला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. पाटणासाठी सचिनने 14 गुण मिळवले, तर उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या मोहम्मदराझा शाडलूने हाय 5 पूर्ण केला. रजनीशने टायटन्ससाठी सुपर 10 मारला, पण दुसर्‍या हाफमध्ये तो फक्त एकच गुण घेऊ शकला. दुसर्‍या सामन्यात यूपी योद्धाने दबंग दिल्लीचा 44-28 असा पराभव करीत गुणतालिकेत जबरदस्त झेप घेतली आणि तिसरे स्थान गाठले. प्रदीप नरवालने सामन्यात चमकदार कामगिरी करत सुपर 10 आणि 14 रेड पॉइंट घेतले. दबंग दिल्लीचा 20 सामन्यांमधील हा सहावा पराभव आहे. तरीही ते दुसर्‍या स्थानावर राहिले आहेत.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply