कोलकाता ः वृत्तसंस्था
एकदिवसीय मालिकेनंतर आता भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात ट्वेन्टी-20 मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी (दि. 16) कोलकाता येथील इडन गार्डन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. विंडीजविरुद्धची एकदिवसीय मालिका भारताने 3-0 अशी निर्भेळ जिंकली. उभय संघांमध्ये 16, 18 आणि 20 फेब्रुवारी असे कोलकाता येथे तीन सामने होणार आहेत. यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार केएल राहुल आणि अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल यांना या टी-20 मालिकेतून वगळण्यात आले आहे. या दोन खेळाडूंच्या अनुपस्थितीत ऋतुराज गायकवाड आणि दीपक हुडा यांचा बदली संघात समावेश करण्यात आला आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर या मालिकेतून बाहेर पडला आहे. हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे सुंदर सामने खेळू शकणार नाही. बायो बबल प्रोटोकॉलमुळे बीसीसीआय बदली खेळाडू देऊ शकत नसल्याचे वृत्त आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, अवेश खान हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुड्डा.