Breaking News

प्रो कबड्डी लीग : यूपी वि. पुणे आज पहिली एलिमिनेटर लढत

बंगळुरू ः वृत्तसंस्था

प्रो कबड्डी लीगमध्ये सोमवारी (दि. 21) यूपी योद्धा आणि पुणेरी पलटण या दोन संघांमध्ये पहिली एलिमिनेटर लढत रंगणार आहे. यांच्यातील विजेता उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात पाटणा पायरेट्सविरुद्ध भिडेल. प्रो कबड्डी लीगच्या अखेरच्या साखळी लढतीत पाटणा पायरेट्सकडून 30-27 अशा पराभवामुळे हरियाणा स्टीलर्सचे आव्हान संपुष्टात आले. याचा फायदा पुणेरी पलटणला होऊन ते बाद फेरीत प्रवेशकर्ते झाले. अखेरच्या चढाईपर्यंत रंगतदार ठरलेल्या या सामन्यात एक मिनिट बाकी असताना विकास खंडोलाची अव्वल पकड झाली आणि सामना हरियाणाकडून निसटला. पाटण्याकडून सचिनने महत्त्वाची भूमिका बजावली. पाटणा, दबंग दिल्ली आणि यूपी योद्धा या तीन संघांनी बाद फेरी आधीच निश्चित केली होती. अखेरच्या दिवशी गुजरात, बंगळुरू बुल्स आणि पुणेरी पलटण या तीन संघांनी बाद फेरी गाठली, तर हरियाणा आणि जयपूरची वाटचाल संपुष्टात आली. दरम्यान, दुसरी एलिमिनेटर लढत 23 फेबु्रवारी रोजी गुजरात जायंट्स वि. बंगळुरू बुल्स यांच्यात होईल आणि यामधील विजेता उपांत्य फेरीच्या दुसर्‍या सामन्यात दबंग दिल्लीशी दोन हात करेल. मग अंतिम सामना 25 फेब्रुवारी रोजी रंगणार आहे.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply