

पनवेल : भाजप तालुका उपाध्यक्ष सुशिलकुमार शर्मा यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, युवा नेते हॅप्पी सिंग, कामोठे युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, अमर ठाकूर, नवनाथ भोसले, प्रवीण कोरडे, तेजस जाधव, किरण जाधव, अमित जाधव, सुजित पुजारी आदी उपस्थित होते.
भाजपच्या उत्तर रायगड महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी आशा भगत यांची निवड

पनवेल : भाजपच्या उत्तर रायगड महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी आशा भगत यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन केले. या वेळी उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, नगरसेवक अनिल भगत, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष के. के. म्हात्रे आदी उपस्थित होते.