Breaking News

रोह्यातील रोठ बुद्रुकमध्ये शिवपालखी मिरवणूक

धाटाव ़: प्रतिनिधी

राजमुद्रा फाउंडेशनच्या वतीने शनिवारी रोठ ब्रुदुक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. शिवभक्तांच्या उपस्थिती गावात शिवप्रतिमेची पालखी काढण्यात आली होती.

सरपंच नितीन वारंगे, उपसरपंच वेदीका डाके, सदस्या वैभवी भगत, माजी उपसरपंच खेळु वारंगे, देऊ वारंगे, दत्ता डाके, श्रद्धा घाग, गुणाजी घाग, तुकाराम वारंगे, चंद्रकांत वारंगे, शशिकांत सांळुखे, समिर वारंगे, विरेंद्र वारंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत   महाराजांच्या मुर्तीचे पूजन करण्यात आले. या वेळी प्रसिद्ध शिवव्याख्याते सचिन करडे  याचे व्याख्यान झाले, ई-श्रम कार्ड वाटप करण्यात आले तसेच साहसी खेळाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

राजमुद्रा फाउंडेशनचे संस्थापक ग्रामपंचायत सदस्य अमित घाग, अध्यक्ष राजेश  डाके, कार्याध्यक्ष राजेश भगत, विलास डाके, सागर डाके यांच्यासह  फाउंडेशनचे कार्यकर्र्तेे व शिवभक्त ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply