पेण : राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि महायुतीचे स्टार प्रचारक देवेंद्र फडणवीस यांची तोफ शुक्रवारी (दि. 11) पेण नगर परिषदेच्या मैदानावर धडाडणार आहे. माजी मंत्री व पेण विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांच्या प्रचारार्थ दुपारी 2 वाजता ही जाहीर सभा होणार आहे. या सभेस रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, अवधूत तटकरे, निरंजन डावखरे, माजी आमदार अनिल तटकरे, महायुतीचे अलिबागचे उमेदवार महेंद्र दळवी, जि. प. सदस्य किशोर जैन, भाजप जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, आरपीआयचे कोकण अध्यक्ष जगदिश गायकवाड, भाजप पेण तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील, शहराध्यक्ष हिमांशू कोठारी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नरेश गावंड, तालुकाध्यक्ष अविनाश म्हात्रे, महिला आघाडीच्या दीपश्री पोटफोडे, ‘शिवसंग्राम’चे आप्पा सत्त्वे आदी उपस्थित राहणार आहेत.
Check Also
वडापाव दिवस २३ ऑगस्ट; सिनेमाच्या जगातही भारी टेस्टी!
वडापाव असं म्हणताक्षणीच तुम्हा प्रत्येकाच्या जीभेवर म्हणा, डोळ्यासमोर म्हणा, आठवणीत म्हणा त्याची चव आलीच असणार. …
RamPrahar – The Panvel Daily Paper