Breaking News

कर्जत शेलू येथे रक्तदान शिबिर

कर्जत : बातमीदार

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शेलू (ता. कर्जत) येथील शिवमंदिरात घेण्यात आलेल्या शिबिरात 33 जणांनी रक्तदान केले.

शिवक्रांती सामाजिक संघटना तसेच शेलू ग्रुप ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी गावातील शिवमंदिरात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. ठाणे येथील पै. वामनराव ओक रक्तपेढीचे सुरेंद्र बेलवलकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी या शिबिरात रक्तसंकलन केले. यावेळी शेलूचे उपसरपंच महेश खारीक, पोलीस पाटील रामदास मसणे, तसेच एकनाथ डुकरे, मंगेश तरे, रोटेरियन अर्जुन तरे, दीपक डांगरे, कृष्णा बोराडे, सर्वेश हिरेमठ, अक्षय हिसाळगे, रोशन मसणे उपस्थित होते. शिवक्रांती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष अविनाश भोईर, ओमकार राऊत,  अमोल पाटील, रसिका डुकरे, तेजश्री कांबरी, ज्योत्स्ना शिंदे, शिवानी डुकरे, भास्कर डोईफोडे, यश बाबरे, रोहित तुपे, आकाश विरले, हर्षद कांबरी, प्रथमेश कांबरी, सागर हिसाळगे यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्तभारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांचा विशेष …

Leave a Reply