Breaking News

द्रुतगती मार्गावर दोन व मुंबई-पुणे महामार्गावर एक अपघात, दोघांचा मृत्यू

खोपोली : प्रतिनिधी

द्रुतगती मार्गावर मंगळवारी (दि. 30) पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास दोन वेगवेगळे अपघात झाले यात एकाचा मृत्यू झाला. तर जुन्या मुंबई -पुणे महामार्गावर पहाटेच साडेपाच वाजण्याच्या सुमारास अन्य एका अपघातात एकाचा मृत्यू झाला. या तीन अपघातात एकूण दोघांचा मृत्यू व दोन जण जखमी झाले आहेत. दरम्यान द्रुतगती मार्गावर एका मालवाहक ट्रकला अचानक आग लागली. या आगीत पूर्ण ट्रक खाक झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. लागोपाठ घडलेल्या या अपघाताच्या घटनांनी पहाटे दोन्ही महामार्गावर आपत्कालीन यंत्रणा, पोलीस प्रशासन कामाला लागले होते.

मंगळवारी पहाटे साडे तीन वाजता द्रुतगती मार्गावर पुणे लेनवरील आडोशी उतारावर ट्रकची अज्ञात वाहनाला धडक बसून अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला तर ट्रक चालक गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. याच दरम्यान दुसरा एक अपघात घडला यातही एकजण गंभीर जखमी असून, त्यालाही एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पहाटे साडे पाच वाजता जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर घोडीवली फाटा येथे ट्रकच्या धडकेत कल्पेश भरत पाटील (रा. शिरपूर, जि. धुळे) या व्यक्तीचा मृत्यू झाला.

या अपघातातील मदतकार्य संपत नाही तोच द्रुतगती मार्गावर खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मालवाहतूक ट्रकला भीषण आग लागली. नागपूरहून तळोजा येथे चाललेल्या ट्रक (एमएच-40,बीएल-7967) च्या केबिनला खोपोली-ढेकू गावाच्या हद्दीत अचानक आग लागली. या आगीत ट्रकची संपूर्ण कबिन जळून खाक झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.  देवदूत यंत्रणा, मृत्युंजय देवदूत, आयआरबी पेट्रोलिंग आणि बोरघाट पोलीस यांच्या प्रयत्नाने ही आग विझवली गेली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply