Breaking News

माथेरानमध्ये मोफत आरोग्य व रक्तदान शिबिर

कर्जत : बातमीदार

स्वर्गीय दयानंद डोईफोडे ऋणानुबंध मित्र परिवारा तर्फे मंगळवारी (दि. 30) माथेरानमधील अ‍ॅसेंम्बली हॉलमध्ये मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात नेत्र, दंत, रक्त आणि विविध आजारांची तपासणी करण्यात आली. या वेळी पर्यटकांसह स्थानिक नागरिकांनी रक्तदान केले. मुंबईतील सर्वोदय हॉस्पिटलच्या रक्तपेढीने रक्तसंकलनाचे काम केले. नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, माजी नगराध्यक्ष अजय सावंत, विवेक चौधरी यांच्यासह नगरसेवक नगरसेविका आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. बॉम्बे हॉस्पिटलचे संजय परब, दिलीप परब, स्पार्क फॉऊन्डेशनचे डॉ. कमलेश जैन, डॉ. आनंद पांडे, दंत चिकित्सक डॉ. स्नेहल सोनावणे, सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी, नेत्र चिकित्सक सुशिल राईकर, किशोर काळे, मयुर सकपाळ, स्व. दयानंद डोईफोडे ऋणानुबंध मित्र परिवाराचे देवानंद कदम, विशाल डोईफोडे, मयुरी शिंदे, विशाल परब तसेच अनेक कार्यकर्त्यांनी या शिबीराच्या आयोजनात विशेष परिश्रम घेतले होते.

Check Also

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने विविध समाजोपयोगी उपक्रम

स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार, लोकप्रतिनिधी सत्कार, गुणीजनांचा सन्मान आणि सांस्कृतिक कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्तकष्टकऱ्यांचे द्रष्टे …

Leave a Reply