Breaking News

चिरनेरमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

चिरनेर : प्रतिनिधी

उरण तालुक्यातील चिरनेर येथील माजी विद्यार्थी मंडळाच्या वतीने नववा स्नेहमेळावा प्राथमिक केंद्र शाळेत रविवारी (दि. 17) झाला. ज्या शाळेने हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानामृत पाजून, त्यांना जीवनात यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले आहे त्या शाळेचे ॠण कधीच विसरता येणार नाहीत, असे उद्गार ग्रीन लॅण्ड डेव्हलपर्सचे व्यवस्थापकीय संचालक भास्कर मोकल यांनी अध्यक्षीय भाषणात काढले.

या स्नेहमेळाव्यास उद्योगपती पी.पी. खारपाटील, सरपंच संतोष चिर्लेकर, पं.स.सदस्य शुंभागी पाटील, प्राचार्य गणेश ठाकूर, सेवानिवृत्त न्यायाधीश चंद्रहास म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार धनंजय गोंधळी, कीर्तनकार एकनाथ पाटील, निवृत्त अधिकारी नंदकुमार पाटील, सुरेश पाटील, संस्थापक वसंत भाऊ पाटील, साहित्यिक ए. डी.पाटील, दामोदर केणी, ग्रामपंचायत सदस्य रमेश फोफेरकर, सविता केणी, शीतल घबाडी, ज्येष्ठ नागरिक तुकाराम पाटील, राजाराम म्हात्रे आदी संख्येने उपस्थित होते. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आणि संघटनेच्या दिवंगत सभासदांना या वेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्राचार्य गणेश ठाकूर यांनी या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने अनेक जुन्या मित्रांना भेटल्याचा आनंद व्यक्त केला. ज्येष्ठ पत्रकार धनंजय गोंधळी यांनी माजी विद्यार्थी मंडळाच्या कार्याबाबत उपयुक्त सूचना करीत मंडळाचे सल्लागार या नात्याने उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले; तर माजी विद्यार्थी मंडळाच्या उपक्रमात विद्यार्थी विकास हा प्रमुख मुद्दा असेल असे अ‍ॅड. सुमित म्हात्रे यांनी आवर्जुन सांगितले. निरपेक्ष भावनेने समाजासाठी योगदान देणार्‍या व्यक्तिमत्वांचा या वेळी सत्कार करण्यात आला. यात डॉ. शशिकांत पोवळे, भारतीय सैन्य दलातील माजी सैनिक वसंत चांगा म्हात्रे, अरुण बारका ठाकूर व सचिन कृष्णा कडू, वीरपत्नी संपदा रेवसकर, लता ठाकूर, विशेष कौशल्यप्रधान ताई कातकरी, अ‍ॅड. प्रसाद पाटील, अ‍ॅड सुमित म्हात्रे, अ‍ॅड. सुबोध खारपाटील, अ‍ॅड. उदय मोकल, अ‍ॅड. नुतन केणी, अ‍ॅड प्रतिभा केणी, अ‍ॅड. अश्विनी खारपाटील, अ‍ॅड. दर्शना पाटील, अ‍ॅड. धनंदा मोकल, अ‍ॅड. सचिन मोकल, अ‍ॅड. संजय जुवेकर, उच्चशिक्षित प्रणिता मोकल यांचा समावेश होता; तर वयाची 75 वर्षे पार करणार्‍या तुळशीदास चिर्लेकर, हरिश्चंद्र ठाकूर, रामचंद्र म्हात्रे, एकनाथ मोकल व गोपाळ खारपाटील या सभासदांचाही सत्कार करण्यात आला. मान्यवरांपैकी अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेविषयीचे अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. प्रफुल्ल वशेणीकर यांनी केले. सुरुवातीला गायिका सुजाता गोंधळी व संगितकार वामनबुवा म्हात्रे यांनी इशस्तवन व स्वागतगीत सादर केले. प्रास्ताविक अध्यक्ष दामोदर केणी यांनी केले अहवाल वाचन सेक्रेटरी रामचंद्र म्हात्रे यांनी केले. उपस्थितांचे आभार दामोदर केणी यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply