लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना खाडे यांचे अभिनंदन

पनवेल : रामप्रहर वृत्त

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका अर्चना खाडे चव्हाण सर्वोत्कृष्ट शाळा प्रमुख पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या यशाबद्दल ‘रयत’च्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मुख्याध्यापिका अर्चना यांचा सत्कार केला. या वेळी रायगड विभागीय अधिकारी रोहिदास ठाकूर, पीआरओ बाळासाहेब कारंडे आदी उपस्थित होते.

शिक्षणाच्या विस्तारासाठी मिश्रित शिक्षणाने संधी उपलब्ध करून दिली आहे. ही विद्यार्थी केंद्रित पद्धत अलीकडच्या काळात खूप यशस्वी ठरली आहे. सर्वोदय स्कूल कॉम्प्लेक्सने सिंघानिया क्वेस्ट प्लस च्या संयुक्त विद्यमाने, मिश्रित शिक्षणावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते जे कोरुना संकटाच्या काळात सामान्य झाले. या कार्यक्रमासाठी विविध शाळांमधील 70हून अधिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, कामोठे शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना खाडे चव्हाण यांनी सहभाग घेतला.

या चर्चासत्राच्या शेवटी सात जूरी सदस्यांनी उत्कृष्ट शाळा प्रमुखपुरस्कार नामंकानांचे मूल्यमापन केले. नामांकनांमध्ये मुख्याध्यापिका अर्चना खाडे चव्हाण यांना शैक्षणिक क्षेत्रातील प्रशंसनीय योगदानाबद्दल सर्वोत्कृष्ट सर्वांगीण शिक्षणाचा प्रसार करणार्‍या सर्वोत्कृष्ट शाळा प्रमुख पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Check Also

Have you been on the e, utilizing the thrill off a genuine gambling enterprise sense?

Finest Crazy Go out Gambling establishment Web sites elizabeth Online Uk Do you really discover …

Leave a Reply