Breaking News

राज्यपालांचे अधिकार कमी करणे योग्य नाही; देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारवर टीका

 

नागपूर : प्रतिनिधी

राज्यात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाचा मुद्दा जोर धरत आहे. या अध्यक्षपदाच्या निवडीसाठीच्या नियमांमध्ये राज्य सरकारने बदल केले आहे, पण त्याला भाजपने जोरदार विरोध केला आहे. राज्यपालांचे अधिकार कमी करणे हे योग्य नाही, त्यामुळे भाजप त्याचा विरोध करत आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकी संदर्भात राज्यपालांचे जे अधिकार आहेत, त्याबद्दल राज्यपाल निर्णय घेतीलच, पण विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसंदर्भात राज्यपालांच्या अधिकारांमध्ये जे बदल करण्यात आले आहेत, ते संविधानातील तरतुदींशी सुसंगत वाटत नाही. अशाप्रकारे राज्यपालांचे अधिकार कमी करणे आणि मंत्रिमंडळाचा सहभाग वाढवणे हे योग्य नाही, त्यामुळे भाजप त्याचा विरोध करत आहे, असे फडणवीस म्हणाले. राज्य सरकारने पाठवलेला विधानसभा अध्यक्षपदाचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी स्वीकारणार की नाकारणार याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडी सरकारने विधानसभा अध्यक्ष निवडीचे नियम बदलले आहेत. आता सरकारने याबाबतचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवला आहे. अजून त्यांनी राज्य सरकारने पाठवलेला प्रस्ताव बघितला नसल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या उमेदवाराची सोमवारी सायंकाळी घोषणा होऊ शकते. 

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply