Breaking News

’सीकेटी’त विविध दिन उत्साहात साजरे

पनवेल ः रामप्रहर वृत्त

स्वातंत्र्यवीर सावरकरांची 26 फेब्रुवारी रोजी असलेली पुण्यतिथी, 27 फेबु्रवारी हा जागतिक मराठी गौरव दिन आणि 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन हे तीन दिवस जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यमात एकत्रितपणे साजरे करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पर्यवेक्षिका नीरजा यांनी सरस्वती पूजन केले. शिक्षकांनी सर्व महापुरूषांच्या प्रतिमेचे पूजन केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख सुप्रिया ताम्हनकर यांनी या तीन दिवसांची माहिती देताना स्वातंत्र्यवीर सावरकरांची मराठी भाषा शुद्धीकरण चळवळ आणि त्यांनी मराठी भाषेला दिलेले नवीन शब्द याविषयी सांगताना सावरकरांचा विज्ञानवादी दृष्टीकोन विषद केला. मराठी शिक्षिका योगिता पाटील यांनी या तीन दिवसांची महत्त्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली आणि वि. वा. शिरवाडकर यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाविषयी सांगितले, तर ऋतुजा म्हात्रे, सावनी म्हात्रे, किर्ती तांबडे, ऋत्विक पाटील व कौशल पडेलकर या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

मराठी दिनानिमित्त मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. या अंतर्गत स्वामी विवेकानंदाच्या चरित्राचे ऑनलाइन वाचन करण्यात आले तसेच संतांची माहिती आणि अभंग यांचे लिखित संकलन आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या माहितीचे पॉवर पाँईट प्रेझेंटेशन विद्यार्थ्यांनी केले. विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अतुलनीय कार्याची जाणीव व्हावी तसेच मराठी भाषेची गोडी लागावी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा अशा उद्देशाने हे तीनही दिन आम्ही एकत्रितपणे साजरे करतो, असे या वेळी मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले.

Check Also

सुभाष घईंच्या दिग्दर्शनाची यशस्वी पन्नाशी

तुम्हालाही माहित्येय आज आपण डिजिटल युगात वावरतोय, चित्रपट माध्यमात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय, …

Leave a Reply