Breaking News

रोज बाजार, आठवडी बाजारसंदर्भात पनवेल मनपाची बैठक

पनवेल ः प्रतिनिधी

रोज बाजार, आठवडी बाजार विकसित करण्याच्या दृष्टीने आयुक्त गणेश देशमुख यांनी बुधवारी विभागप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी संबंधित अधिकार्‍यांना याबाबत सूचना देण्यात आल्या.

या बैठकीला अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, नगररचना सहाय्यक अधिक्षक ज्योती कवाडे, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, लेखाधिकारी डॉ. संग्राम व्होरकाटे, मुख्य लेखा परिक्षक विनयकुमार पाटील तसेच सर्व विभागप्रमुख,खाते प्रमुख या बैठकीस उपस्थित होते.

रोज बाजार, आठवडी बाजार विकसित करण्याच्या दृष्टीने जागेची पाहणी, शेडचे नियोजन याबरोबरच प्रशासकिय इमारत, महापौर बंगला, प्रभाग समिती कार्यालये, क्रिकेट प्रशिक्षण केंद्र या विकास कामांच्या निविदा प्रक्रियांचा आढावा घेतला. वसतिगृहे, पंतप्रधान आवास योजना, सोलार पॅनेल बसविणे, सिडकोकडील भूखंड व पायाभूत सुविधांच्या हस्तातरांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. पावसाळ्याच्या आधी रस्त्यांचे पॅचवर्क करण्याच्या सूचना बांधकामास विभागास आयुक्तांनी दिल्या.

Check Also

‌‘एसआयआर‌’संदर्भात सर्वपक्षीय शिष्टमंडळाची प्रशासनाशी चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानाच्या …

Leave a Reply