Breaking News

पनवेलमध्ये राष्ट्रीय कीर्तनसप्ताहाची सांगता

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त कै. मुग्धा लोंढे यांचे स्मरणार्थ आणि महिला दिनाचे औचित्य साधत नगरसेविका रुचिता लोंढे आणि परिवाराच्या वतीने राष्ट्रीय कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. पनवेल येथील विरूपाक्ष मंदिरात हा सप्ताह संपन्न झाला. याचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांचे हस्ते करण्यात आले.

या सप्ताहात रायगड कीर्तन संकूलातील अथर्व घाटे (पेण)अवनी गद्रे (पाली),श्रुती बोंद्रे (अलिबाग), सुखदा मुळ्ये-घाणेकर तर दर्शन वझे (पुणे), सायली मुळ्ये (रत्नागिरी), ज्योत्स्ना गाडगीळ (अंबरनाथ) या युवा पिढीतील कीर्तनकारांनी उत्तम रितीने क्रांतिकारकांची चरित्रे सांगून राष्ट्रीय धर्माचा जागर केला. नंदकुमार कर्वे यांनी संवादिनी तर गणेश घाणेकर, आदित्य उपाध्ये यानी तबलासाथ केली. कीर्तन सोहळा यशस्वी करण्यात  गुरुनाथ लोंढे, चंद्रकांत मने, व किरण बापट यांंनी  मोलाचे योगदान दिले.

विशेष म्हणजे याच कीर्तनकारांनी नवीन पनवेल येथील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हायस्कूलमध्ये कीर्तनसप्ताह संपन्न केला. शालेय विद्यार्थ्यांच्या समोर स्वातंत्र्यापूर्व काळातील इतिहास जागा करण्याची संधी दिल्याबद्दल सर्वच कीर्तनकारांनी वैशंपायन यांचे विशेष आभार मानले.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply