Breaking News

खारघर, कामोठे वसाहतींना टँकरद्वारे वाढीव पाणीपुरवठा करा

पनवेल मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांची सूचना

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 11) प्रभाग समिती ’अ’ व ‘क’च्या कार्यालयात बैठक घेऊन सिडकोच्या खारघर व कामोठे वसाहतींना महापालिकेने टँकरद्वारे वाढीव पाणीपुरवठा करण्याची सूचना दिली. खारघर व कामोठे येथे झालेल्या या बैठकांना महापालिका स्थायी समिती अध्यक्ष नरेश ठाकूर, सभापती अरुणा भगत, नगरसेवक हरेश केणी, प्रवीण पाटील, विजय चिपळेकर, नगरसेविका संजना कदम, नेत्रा पाटील, अनिता पाटील, समीर कदम, किर्ती नवघरे, अमर उपाध्याय, रवी भगत, विकास भगत, भाऊ भगत, रवींद्र भगत, वासुदेव पाटील आदी उपस्थित होते.या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी, पनवेल महापालिकेने खारघर वसाहतीला मागणी असेपर्यंत 25 टँकरद्वारे आणि कामोठ्यासाठी 10 टँकरने वाढीव पाणीपुरवठा करावा, अशा सूचना दिली.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply