
खारघर : रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रेरणेतून व भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनातून शुक्रवारी (दि. 8) खारघर येथे भाजपच्या भटके विमुक्त आघाडीची बैठक झाली.
भाजप या राष्ट्रीय पक्षाची वेगवेगळ्या छोट्या छोट्या समूहाच्या प्रति असलेल्या ध्येय धोरण अन राष्ट्रीय प्रवाहात सामील होण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेवरून मतदारसंघात बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. अठरा पगड जातींना सोबत घेऊन त्यांना प्रतिनिधित्व देऊन त्यांचा सन्मान करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते.
या वेळी नागरिकांशी संवाद साधताना उत्तर रायगड भटके विमुक्त आघाडी जिल्हा संयोजक बबन बारगजे, उत्तर रायगड जिल्हा प्रभारी चंद्रकांत मंजुळे, भटक्या विमुक्त जमाती महिला आघाडी जिल्हाध्यक्ष विद्या तामखडे, उत्तर रायगड भटके विमुक्त आघाडी महिला उपाध्यक्ष नीता मंजुळे, विठ्ठल आंदळे कार्यकारी सदस्य, खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे, महिला मोर्चा अध्यक्ष वनिता पाटील, उत्तर रायगड सोशल मिडीया सहसंयोजिका मोना अडवाणी, ज्येष्ठ नागरिक सेलचे संयोजक नवनीत मारू, महिला मोर्चा सरचिटणीस साधना पवार, आयटी सेल संयोजक रूपेश चव्हाण, सेक्टर 11 अध्यक्ष अश्विनी भुवड, प्रिया दळवी, खारघर मंडल भटके विमुक्त आघाडी संयोजक दिलीप आडे, भीमा मिस्त्री, कृष्णा खडगी आदी उपस्थित होते.

RamPrahar – The Panvel Daily Paper