कर्जत : प्रतिनिधी
कर्जत शहरात गॅस्ट्रोची साथ आली असून 20हून अधिक रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून खासगी रुग्णालयातदेखील रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याची माहिती मिळताच नगर परिषद सतर्क झाली आहे. नागरिकांनी पाणी उकळून पिण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या कडक ऊन पडत आहे. तापमानाचा पारा दिवसेंदिवस वर सरकत असताना कर्जत शहरातील मुद्रे आणि दहिवली भागात दोन जणांना गॅस्ट्रोची लागण झाली. त्यानंतर 40च्या आसपास रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील 14 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून उर्वरित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
गॅस्ट्रोची साथ कशामुळे आली याचा शोध नगर परिषद घेत असून पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
Check Also
वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश
पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …
RamPrahar – The Panvel Daily Paper