Breaking News

उत्तर प्रदेशातील मुस्लिम महिलांचा भाजपला पाठिंबा

लखनौ ः वृत्तसंस्था

उत्तर प्रदेशमध्ये वास्तव्याला असलेल्या एका 33 वर्षीय मुस्लिम महिलेने तिहेरी तलाक देण्याऐवजी पतीविरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे. विशेष म्हणजे तिने कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन हा निर्णय घेतला आहे. ब्युटी पार्लर चालवणार्‍या या महिलेने सांगितले की, मी माझ्या कुटुंबीयांच्या इच्छेविरोधात न्यायालयात जाणार आहे, तसेच 6 मे रोजी मी भाजपलाच मतदान करणार असल्याचेही तिने स्पष्ट केले आहे.

ती मुस्लिम महिला म्हणाली की, मोदी सरकारने तिहेरी तलाकविरोधात आवाज उठवण्याची हिंमत दाखवली. दुसरा कोणताही राजकीय पक्ष यासंदर्भात साधी वाच्यताही करीत नाही. या महिलेने गेल्या वेळी काँग्रेससाठी प्रचार केला होता. 2014मध्ये या महिलेला तिच्या नवर्‍याने कोणतेही कारण नसताना लग्नाच्या 22 दिवसांनंतर अचानक तलाक दिला होता. महिलेच्या माहितीनुसार तिने गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या रिटा बहुगुणा यांच्यासाठी प्रचार केला होता. तिने या वेळी काँग्रेसला अनेक प्रश्न विचारले आहेत. त्यांनी आमच्यासाठी काय केले. भाजपने कमीत कमी आमची खराब परिस्थिती तरी लोकांसमोर आणली, अशी प्रतिक्रिया सदर महिलेने दिली आहे.

मोदी सरकारने पेन्शन योजनांपासून एलपीजी गॅस कनेक्शनपर्यंत आमच्यासाठी बरंच काही केले. सरकारने केलेल्या कामांमुळेच मी त्यांना मतदान करणार असल्याचेही या मुस्लिम महिलेने आवर्जून सांगितले आहे. या महिलेसारखेच 26 वर्षांच्या निशात फातिमानेही तिहेरी तलाकचा अध्यादेश आणल्यामुळे भाजपला मतदान करण्याचे मनोमन ठरवून टाकले आहे. दोन मुलांची आई असलेल्या निशातला पतीने पाच वर्षांनंतर फोनवरून तलाक दिला आहे. निशातने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे ट्विटरच्या माध्यमातून मदतीसाठी याचना केली. त्यानंतर ती भाजपकडून करण्यात आलेल्या तिहेरी तलाकच्या सेमिनारमध्येही उपस्थित राहिली. उत्तर प्रदेशात कमीत कमी 20 टक्के लोकसंख्या ही मुस्लिमांची आहे. त्यामुळे  हिंदुत्ववादी चेहरा असलेल्या भाजपला त्यांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या सर्वसामान्यांच्या दृष्टीने हिताच्या कामांमुळे तसेच तिहेरी तलाकच्या निर्णयामुळे मुस्लिम मते मिळण्याची शक्यता आहे.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply