
मुरुड : प्रतिनिधी
शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने शनिवारी नांदगाव मराठी शाळा क्र.1 च्या पटांगणात शनिवारी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. पत्रकार उदय खोत यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित भाषणे केली. संजय ठाकूर यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. मंडळाचे अध्यक्ष महेश कोतवाल, विनोद जोशी, चंद्रकांत देऊळकर, राज पवार, प्रभाकर निरकर, मंदार साखरकर, सिद्धेश ठोंबरे, कुसुमाकर घुमकर यांच्यासह शिवप्रेमी नागरिक या वेळी उपस्थित होते.