100 टक्के निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा
पनवेल ः प्रतिनिधी
शिक्षणासोबत कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातही नावलौकिक मिळवलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने बारावी सीबीएसई बोर्ड परीक्षेत आपली उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत सुवर्णयश प्राप्त केले आहे. गुणवत्तेच्या जोरावर शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे. त्याबद्दल संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 3) विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.
मार्च 2019मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी सीबीएसई सायन्स व कॉमर्स विभाग परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. सायन्स विभागात रुचिता कुमार पटेल हिने (पीसीएम) 96.33 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. पलक कुमारी हिने (पीसीबी 93.33 टक्के) द्वितीय, भैरवी सावंतने (पीसीबी 92.33 टक्के) तृतीय, तर राहुल पांडे याने (पीसीबी 91.67 टक्के) चतुर्थ क्रमांक मिळविला. कॉमर्स विभागात सर्वेश अगरवालने 90.20 टक्के गुण मिळवून प्रथम, अजित सिंग राजपुरोहितने (88.80 टक्के) द्वितीय, कल्याणी हरेषकुमार पटेलने (84.20 टक्के) तृतीय, तर मनरूप सिंग धिल्लोनने (83.40 टक्के) चतुर्थ क्रमांक पटकावला आहे.
फिजिकल एज्युकेशनमध्ये हर्षींन कौर चिमा आणि प्रतीक्षा पांडव यांनी 100 टक्के गुण, मॅथेमॅटिक्समध्ये रुचित कुमार पटेलने 99 टक्के, बायोलॉजीत भैरवी सावंतने 98 टक्के, इंग्लिश कोरमध्ये पलक कुमारीने 98 टक्के व फिजिक्समध्ये 95 टक्के गुण मिळवले. रुचित कुमार पटेलनेही फिजिक्समध्ये 95 टक्के गुण, केमिस्ट्रीमध्ये रुचित कुमार पटेल, करण सैनी, राहुल पांड्ये, भैरवी सावंत, शाहिद खान, अनिरुद्ध गांगुर्डे, शोबिन शाजी जॉय यांनी प्रत्येकी 95 टक्के, बिजनेस स्टडीजमध्ये सर्वेश अगरवाल, अजित सिंग राजपुरोहित, मनरूप सिंग धिल्लन, दीपिका चाहर व साक्षी संपतराव माळी यांनी प्रत्येकी 95 टक्के, कॉम्प्युटर सायन्समध्ये आकाश पाटील आणि ऋषिकेश राजेश यांनी 92 टक्के, इकॉनॉमिक्समध्ये कल्याणी हरिशकुमार पटेलने 91 टक्के, तर अकाऊंट्समध्ये सर्वेश अगरवालने 87 टक्के गुण मिळवले.
सर्व विद्यार्थ्यांनी केलेल्या चमकदार कामगिरीमुळे रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणार्या शिक्षकांचे लोकनेते रामशेठ ठाकूर आणि संस्थेच्या पदाधिकार्यांनी अभिनंदन केले. या वेळी शाळेच्या प्राचार्या राज अलोनी आणि शिक्षकवर्ग उपस्थित होता.