Breaking News

डॉ. आंबेडकरांचे कार्य भारतीयांसाठी महान -मोरे

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे सर्वच भारतीयांसाठी महान आहे. त्यांनीच खर्‍या अर्थाने  समानता व लोकशाही आपल्या देशात रुजविली असे प्रतिपादन बँक ऑफ महाराष्ट्र, नवीन पनवेल शाखेचे विशेष सहाय्यक व गुणवंत कामगार अरविंद मोरे यांनी केले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, पनवेल केंद्राच्या वतीने आज  (दि. 14) महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, पनवेलने बालग्राम, खांदा कॉलनी, पनवेल येथे मोठ्या उत्साहात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याची जयंती साजरी झाली. या वेळी शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. नीलिमा अरविंद मोरे,  बँक ऑफ महाराष्ट्र, नवीन पनवेल शाखेचे विशेष सहाय्यक व गुणवंत कामगार, अरविंद मोरे, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे केंद्र प्रमुख, प्रवीण सकट, सहाय्यिका शोभा पाटील, बालग्रामचे अधीक्षक डॉ. विनायक पाटील व रेखा दीपक जाधव हे उपस्थित होते.  याप्रसंगी प्रमुख वक्ते अरविंद मोरे पुढे म्हणाले, डॉ. आंबेडकरांनी स्त्रियांना समानता प्राप्त करून दिली. त्यांनी कामगारांसाठी समान वेतन, समान कामाचे तास दिले. विशेष म्हणजे त्यांच्यावर एवढे अन्याय होऊन सुद्धा त्यांनी देशवासियांसाठी मोलाचे कार्य केले हे विशेष, ते ग्रंथप्रेमी होते. त्यांनी पुस्तकासाठी राजगृह घर बांधले. त्यांचे सर्वात मोठे उपकार भारतीयांसाठी असेल तर ते म्हणजे भारताची राज्यघटना होय. अरविंद मोरे पुढे म्हणाले की, अजूनही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व  कार्य सर्व नागरिकांपर्यंत पोहचलेले नाहीत. जर आपला देश सुजलाम् सुफलाम् करावयाचा असेल तर डॉ. आंबेडकरांचे कार्य हे प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचविणे ही काळाची गरज असल्याचेही ते म्हणाले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या डॉ. नीलिमा अरविंद मोरे म्हणाल्या की, स्त्रियांना खर्‍या अर्थाने जर स्वतंत्र प्राप्त करून दिले असेल तर ते केवळ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच. अगोदरच्या काळी स्त्रियांचे जीवन हे खूपच दयनीय होते. त्यातून स्त्रियांना बाहेर काढण्याचे काम डॉ. आंबेडकरांनीच  केले. तसेच डॉ. मोरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई आंबेडकरांच्या बलिदानाची  सुद्धा आठवण करून दिली. याप्रसंगी अरविंद मोरे व डॉ नीलिमा अरविंद मोरे यांच्या तर्फे डॉ. आंबेडकरांची प्रतिमा, त्यांच्या जीवनावरील पुस्तके ’माझी आत्मकथा’ व ग्रंथप्रेमी डॉ. आंबेडकर’  बालग्राम ग्रंथालय, पनवेल व यश दीपक जाधव, उदय कांबळे, रेखा दीपक जाधव व मीनाक्षी अविनाश भाकरे यांना भेट म्हणून देण्यात आली.   सूत्र संचालन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, पनवेलचे  केंद्र प्रमुख, प्रवीण  सकट यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीसाठी सहाय्यिका शोभा पाटील यांनी परिश्रम घेतले.

पनवेल परिसरात डॉ.आंबेडकर जयंती उत्साहात

पनवेल ः भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्ते व पदाधिकार्यांसह पनवेल, नवीन पनवेल, वडघर, करंजाडे, कामोठे व विविध ठिकाणी भेटी देवून अभिवादन केले आहे. आज सकाळी पनवेल शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. त्यानंतर आंबेडकर भवन येथील कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. तसेच पंचशिलनगर, शिवाजी नगर, करंजाडे, वडघर, ओवळे, जासई अशा विविध ठिकाणावरील जयंती महोत्सवात उपस्थित राहून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले. एकूणच पनवेल परिसरात डॉ.आंबेडकर जयंती उत्साहात झाली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply