Breaking News

पनवेल उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसंख्या वाढली

नागरिकांना सतर्कतेचे आवाहन;  कोविड, उष्माघाताच्या एकही रुग्ण नाही

पनवेल: वार्ताहर

कोरोना तिसर्‍या लाटेत कोविड रुग्णालयाचा दर्जा प्राप्त असलेले उपजिल्हा रुग्णालय नॉनकोविड म्हणून नजीकच्या तीन महिन्यापासून कार्यरत आहे. पनवेलमध्ये कोविडची तिसरी लाट पूर्णपणे ओसरली आहे. क्वचितच कोविडचा एखादा दुसरा रुग्ण आढळत आहे. अशा परिस्थितीत इतर रुग्णांच्या ओपीडीत प्रचंड वाढ झाली आहे. यामध्ये बहुतांशी त्वचा रोगाच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. दररोज जनरल ओपीडीत सुमारे 100 ते 150 रुग्ण भेट देत असतात. नॉनकोविड नंतर तीन महिन्याच्या काळावधीत 60 महिलांच्या प्रसूती यशस्वीपणे पार पडल्या तर 29 महिलांची नसबंदी शस्त्रक्रिया पार पडली.  एकीकडे पारा 40 डिग्री च्या वर पोहचला आहे. मागील दोन महिन्यापासून वाढत्या तापमानाने सर्वांचीच तारांबळ उडाली असताना पनवेल उपजिल्हा रुग्णालयात एकही उष्माघाताच्या रुग्णाची नोंद करण्यात आली नसल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सचिन संकपाळ यांनी दिली. तसेच कोरोनानंतर डोकेदुखी ,सर्दी, अंगदुखी, ताप, त्वचारोग यांसारख्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जानेवारीत त्वचा, तर फेब्रुवारी, मार्च प्रसूतीच्या संख्येत वाढ झाली आहे.

कोरोनाची तिसरी लाट ओसरली

दरम्यान, पनवेल तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येचा आकडा एका लाखाच्या पार गेला आहे. मात्र सध्यातरी पनवेल मध्ये तिसरी लाट पूर्णपणे ओसरली असून केवळ हाताच्या बोटावर मोजण्या एवढे रुग्ण तालुक्यात आहेत.त्यामुळे कोरोना पनवेल मधुन पूर्णपणे  थांबला असल्याचे दिसून येत आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply