Breaking News

पिरकोनमध्ये गॅस हाताळणीबाबत प्रात्यक्षिकासह जनजागृती

उरण ः बातमीदार

तालुक्यातील पिरकोन गावात सूर्या गॅस कंपनी कर्मचारी प्रतिक्षा म्हात्रे हिने गॅस हाताळणी कशी करायची याबाबत योग्य ती माहिती पिरकोन गावातील भाजपचे उरण तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड यांच्या निवासस्थानी नागरिकांना प्रात्यक्षिके देऊन दिली. गॅस हाताळणीविषयी प्रत्यक्षिके व जनजागृती घराघरात व्हायला पाहिजे आणि ती काळाची गरज असल्याचे भाजप तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड यांनी या वेळी सांगितले. या वेळी उपसरपंच दिपाली पाटील, ग्रा. पं. सदस्य संतोष गावंड, सुरेंद्र गावंड, प्रा. प्रमोद म्हात्रे, ज्येष्ठ कार्यकर्ते मंगेश गावंड, गणेश म्हात्रे, महेंद्र पाटील, वैभव गावंड, युवा कार्यकर्ते चंद्रकांत गावंड, महेश गावंड, गणेश महिला मंडळ बचतगटाच्या अध्यक्ष लक्ष्मी गावंड, सचिव बिंदू गावंड, अलका गावंड, योगिता गावंड, शारदा गावंड, बेबी गावंड, अक्षता गावंड, दिव्या गावंड, हेमाक्षी गावंड, समिक्षा गावंड, दर्शिता गावंड आदी उपस्थित होते.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply