पनवेल महापालिका उपायुक्तपदी कल्पिता पिंपळे

पनवेल : रामप्रहर वृत्त

ठाण्याच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता किशोर पिंपळे यांची पनवेल महापालिकेच्या उपायुक्तपदी नियुक्ती झाली असून, मंगळवारी (दि. 19) आयुक्त गणेश देशमुख यांनी त्यांचे महापालिकेत स्वागत केले. या वेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार आदी उपस्थित होते. कल्पिता किशोर पिंपळे यांनी सर्वप्रथम 2010 ते ऑगस्ट 2014 या दरम्यान रायगड जिल्ह्यातील अलिबाग नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. त्यानंतर ऑगस्ट 2014 ते जून 2017 या दरम्यान मिरा-भाईंदर महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदी त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जुलै 2017 ते डिसेंबर 2020 या दरम्यान नगरपरिषद प्रशासन संचालनालय सहाय्यक संचालक पदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर 23 डिसेंबर 2020 ते 18 एप्रिल 2022 या दरम्यान ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदाची जबाबदारी त्यांनी अत्यंत कर्तव्यदक्षतेने आणि निर्भिडपणे निभावली आहे.

Check Also

Midi Bbb Company Profile Bbb

Posts Midi Health Secures $14M Money To take Professional Midlife Care for Women 40+ Each …

Leave a Reply