Breaking News

क्रीडा क्षेत्राला महत्त्व देण्याचे काम लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले

विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे गौरवोद्गार

पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्रातील कबड्डी व कुस्तीच्या खेळाडूंना त्यांच्या उन्नतीसाठी राज्य सरकारकडून ताकद मिळणे अत्यंत गरजेचे आहे, परंतु महाविकास आघाडी सरकारमध्येच हुतूतू सुरू आहे. त्यामुळे त्यांना इतरांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. अशा वेळी क्रीडा क्षेत्राला महत्त्व देण्याचे काम खर्‍या अर्थाने लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले आहे. वेगवेगळ्या क्रीडापटूंना मदत देऊन त्यांना घडविण्याचे काम केले आहे, असे गौरवोद्गार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी धरणा कॅम्प येथे केली.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने जय भवानी नवतरुण मंडळाच्या वतीने 22 ते 24 एप्रिलपर्यंत आमदार प्रशांत ठाकूर चषक भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा धरणा कॅम्प येथे आयोजित करण्यात आली असून स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 22) सायंकाळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, महापौर डॉ. कविता चौतमोल, उप महापौर सीता पाटील, महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, महिला व बाल कल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, प्रभाग समिती सभापती संजना कदम, प्रमिला पाटील, अरुणा भगत, वृषाली वाघमारे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी,  नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, एकनाथ गायकवाड, बबन मुकादम, अभिमन्यू पाटील, प्रविण पाटील, संतोष भोईर, राजेंद्र शर्मा, निलेश बाविस्कर, नगरसेविका चारुशीला घरत, अनिता पाटील, खारघर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष कदम, युवा नेते समीर कदम, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, विपुल पटेल, सूर्यकांत ठाकूर, गीता चौधरी, राम वरदायिनी ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव शिंदे, मंडळाचे अध्यक्ष शेखर कदम, सचिव प्रशांत कदम, खजिनदार जितेंद्र कदम यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कबड्डी प्रेमी, मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेच्या निमित्त अर्जुन पुरस्कार विजेते अर्जुन शिंदे, राजू भावसार आदी क्रीडापटूंचा विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हंटले की, सामाजिक, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पावलावर पाऊल ठेवत आमदार प्रशांत ठाकूर काम करीत आहेत. मातीतल्या खेळाडूंना जास्तीत जास्त मदत व्हायला पाहिजे. यासाठी अधिक प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी आश्वासित केले. तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा आदर्श घेऊन आमदार प्रशांत ठाकूर काम करत असल्याचा पुनरुच्चार करून आयोजक, खेळाडू यांना धन्यवाद दिले.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, रायगड जिल्ह्याला कबड्डी या मैदानी खेळाची परंपरा लाभली आहे. येथील गावागावात अनेक दिग्गज खेळाडू यामध्ये आहेत. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कै. बुवा साळवी यांच्या आशीर्वादाने त्या स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्या. देशात कबड्डी होती पण घराघरात कबड्डीचा थरार पोहोचला तो त्याला मिळालेल्या ग्लॅमरमुळे. जय भवानी तरुण मित्र मंडळाच्यावतीने या गावातून अनेक खेळाडू महाराष्ट्राला दिले आहेत. कोयना प्रकल्पगस्तांचे हे वंशज आहेत. कबड्डी खेळाविषयीचे प्रेम आणि आपली जी दैवत आहेत त्यांच्याविषयी असलेला आदर भाव पुढच्या माहिती करून देण्यासाठी ही सर्व मंडळी प्रयत्न करीत आहेत, असे सांगतानाच आमदार प्रशांत ठाकूर यांनी खेळाडू, प्रेक्षक आणि आयोजकांना धन्यवाद दिले तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याचे आवर्जून नमूद करत प्रवीण दरेकर यांना त्यांनी धन्यवाद दिले.

कबड्डी स्पर्धा घ्यावी अशी विनंती संजना कदम यांनी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडे केली होती आणि त्यावर त्यांनी ताबडतोब होकार दिला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेलमध्ये अनेकदा राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने पुन्हा एकदा स्पर्धा घेण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचे महत्वपूर्ण सहकार्य लाभले, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
– समिर कदम, युवानेते भाजप

या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ 24 एप्रिलला माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार रविंद्र चव्हाण आणि आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते होणार आहे. तर या स्पर्धेतील विजेत्या संघास एक लाख रुपये व आमदार चषक, उप विजेत्या संघास 50 हजार रुपये व आमदार चषक तर उपांत्य विजयी दोन्ही संघास प्रत्येकी 25 हजार रुपये व आमदार चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेतील मालिकावीरास मोटारसायकल, उत्कृष्ट चढाई आणि उत्कृष्ट पकड प्रत्येकी 10 हजार रुपये तर पहिला व दुसरा दिवस मानकरीला प्रत्येकी पाच हजार रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply