Breaking News

विद्यार्थी गुणगौरव, ज्येष्ठांना छत्रीवाटप

रत्नदीप स्पोर्टस् क्लबतर्फे धाकटाखांदा येथे उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त

सिडको अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकुर यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नदीप स्पोर्ट्स क्लबच्या वतीने धाकटा खांदा येथे शनिवारी पदवीधर गुणवंत विद्यार्थांचा गौरव आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्रीवाटप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रभाग क्रमांक 14चे नगरसेवक आणि माजी स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे यांच्या पुढाकाराने दरवर्षी सिडको अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. दरवर्षीप्रमाणे या वेळीही शनिवारी धाकटा खांदा येथे पदवीधर विद्यार्थांचा गुणगौरव आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्रीवाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते जानुशेठ म्हात्रे, शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेविका हेमलता म्हात्रे, माजी नगरसेविका अनिता म्हात्रे, प्रभाग समिती अ चे सभापती शत्रुघ्न काकडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत आणि शहराध्यक्ष जयंत पगडे यांनी नगरसेवक मनोहर म्हात्रे यांच्या कार्याचे कौतुक केले.

Check Also

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भव्य मूट कोर्टचे बुधवारी उद्घाटन

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोहळा पनवेल ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक …

Leave a Reply