Breaking News

युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांनी; पालकांनी मांडल्या विविध समस्या!

खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांची घेतली भेट

 

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबईतील युक्रेन वरून परतलेल्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी  विविध समस्या मांडल्या. ठाणे जिल्हा कार्यालयात महाराष्ट्र भाजप आयटी प्रमुख सतिश निकम यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राज्यसभा खासदार विनय सहस्रबुद्धे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नवी मुंबई सोशल मीडिया प्रमुख दिपक जगताप आणि नवी मुंबई मास मीडिया प्रमुख विनीत मोरे उपस्थित होते. सध्याच्या परिस्थितीत शिक्षण सुरू ठेवण्याच्या या विद्यार्थ्यांच्या अडचणी कमी कराव्यात अशी विनंती यावेळी केली. नॅशनल मेडिकल कौन्सिल आणि पीएमओकडे त्यांचे प्रश्न मांडण्याची विनंती केली. सध्या युक्रेनमधील बहुतेक विद्यापीठे त्यांच्या मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन व्याख्याने आयोजित करत आहेत. परंतु, विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलसाठी लॅबमध्ये प्रवेश नाही. शिष्टमंडळाने डॉ. सहस्त्रबुद्धे यांचे याकडे लक्ष वेधले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply