Breaking News

भोकरपाडा येथे विकासकामांचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन व उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पनवेल आणि उरण तालुक्यात अनेक विकासाची कामे सुरु आहेत. त्याअनुषंगाने भोकरपाडा गावामध्ये रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. याचे भूमीपूजन आणि बसथांब्याचे लोकार्पण भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 6)झाले.

या वेळी त्यांनी पनवेल आणि उरण तालुक्याला आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या रुपाने दमदार नेतृत्व लाभले असल्याने दोन्ही तालुक्यात विकसाची गंगा वाहत आहे, असे प्रतिपादन केले.

उरण विधानसभा मतदार संघातील भोकरडपाडा येथे आमदार महेश बालदी यांच्या 5 लाख रुपयांच्या स्थानिक विकास निधीमधून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन आणि संपर्क पोयंजे प्रमुख सचिन दुर्गे, युवामोर्चा अध्यक्ष गणेश आगिवले आणि गाव अध्यक्ष महेंद्र पाटील पाटील यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या बसथांब्याचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी झाला. या वेळी गुळसुंदे विभागीय अध्यक्ष अविनाश गाताडे, कसळखंडचे माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील, पोयंजे विभागीय अध्यक्ष प्रवीण ठाकूर, पोयंजे विभागीय संपर्क प्रमुख सचिन दुर्गे, अविनाश पडवळ, बारवईचे माजी सरपंच जगन पाटील, भोकरपाडाचे माजी सरपंच काशिनाथ पाटील, जितेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्या  वनिता पाटील, ग्रामपंचायत सदस्य वैशाली आगिवले, माजी उपसरपंच रमेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील, पोलीस पाटील दत्तात्रेय पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य तुकाराम ठाकूर, महिला बचत गट अध्यक्षा माधुरी दुर्गे, बारवई पोलीस पाटील संतोष बाबरे, जेष्ठ कार्यकर्ते बारकू पाटील, बबन मोरे, शैलेंद्र पाटील, संजय ठोंबरे, संदीप शिंदे, प्रकाश पाटील, विनोद शिंदे, राहुल पाटील, तुकाराम ठाकूर, राम  पाटील, संतोष आगिवले, अनंत दुर्गे, पद्माकर पाटील, सुशांत मालकर, रोहित ठाकूर, हेमंत शिंदे, जितेश आगिवले, प्रवीण पाटील, राजू पाटील, गणेश पाटील, नितेश पाटील, वामन पाटील, नितीन हंगे, सुभाष पाटील, अनिल मोरे, कुमार आगिवले, जयेश पाटील, मनोहर पाटील, संतोष पाटील, चेतन पाटील, समीर दळवी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply