Breaking News

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी बुधवारी लोणेरेत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात दीक्षांत समारंभ

माणगाव ः प्रतिनिधी

माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात बुधवारी (दि. 11) सकाळी 11 वाजता 24वा दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी भूषविणार आहेत. समारंभास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्लीचे अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे हेही उपस्थित राहणार आहेत. या समारंभात विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. कारभारी विश्वनाथ काळे हे विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर करणार आहेत. समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू, कार्यकारी व विद्वत्त परिषदेचे सदस्य यांनी केले आहे.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply