Breaking News

महिलेचा विनयभंग करणार्यावर गुन्हा दाखल

पनवेल : वार्ताहर

मेंढ्या चारण्यासाठी घेऊन जात असलेल्या एका महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्त्य करून तिचा विनयभंग केला. या वेळी महिलेने आरोपीस धक्का दिला असता झालेल्या झटापटी मध्ये महिलेच्या गळ्यातील डोरली तुटून नुकसान झाले. त्याबद्दल संबंधित व्यक्तीविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत महिला ही मेंढ्या चारण्यासाठी भिंगार गावाकडे जात असताना सांगडे गाव येथील वीटभट्टी जवळून चालत जात होती. या वेळी आरोप असलेल्या व्यक्तीने अंगावरील सर्व कपडे काढून महिलेच्या जवळ येऊन तिला मिठी मारून तिच्या लज्जा उत्पन्न होईल असे कृत्त्य करून तिचा विनयभंग केला. त्यानंतर तो पळून गेला, तसेच त्याने यापूर्वीदेखील तिचा पाठलाग केला होता. या संदर्भात महिलेने पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Check Also

‘सामना’ पन्नाशीचा झाला…

काही कलाकृतींचे महत्त्व व अस्तित्व हे कायमच अधोरेखित होत असते. ते चित्रपटगृहातून उतरले तरी त्यांचा …

Leave a Reply