दिवसेंदिवस पाणी टंचाई आराखड्यात वाढ; कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक
खोपोली : प्रतिनिधी
तीन धरणांचा आणि बारमाही वाहणार्या नदिचा खालापूर तालुक्यात काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुरू झाला असल्याचा दावा प्रशासन करीत आहे. दर वर्षी तीच गावे टंचाईग्रस्त गावांच्या यादीत दिसून येत आहेत. प्रशासन कागदी घोडे नाचविण्यात अग्रेसर असल्याचे टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे .
सध्या पाच गाव आणि चार वाड्यात टँकरची पाणी वारी सुरू आहे. यंदाच्या टंचाई आराखडा तयार करताना 24लाख75हजार रूपये निधीची तरतूद करण्यात आली होती. टंचाई निवारण कृती आराखड्यात 18गावे आणि 44 वाड्यांचा समावेश करण्यात आला होता.नवीन विंधन विहिर घेणे,टँकरने पाणी पुरवठा करणे,पूरक नवीन पाणी जलवाहिनी घेणे आणि विहिर घेणे इत्यादी उपाययोजना प्रस्तावित होत्या. टँकर किंवा बैलगाडी ने पाणी पुरवठा करणे यादित 17गाव आणि35 वाड्या समाविष्ट होत्या. परंतु टंचाई ची तीव्रता कमी जाणवल्याने एप्रिल अखेर टँकरची गरज पडली असून पाच गाव आणि चार वाड्यात सध्या टँकर रोज धावत आहे.
दरम्यान 2020-21ला 27गावे 39वाड्या टंचाई ग्रस्त यादीत होत्या. त्यासाठी पाऊणकोटीची तरतूद करण्यात आली होती. यंदा मात्र पन्नास लाख तरतूद कमी होती.
आयत्या वेळी नव्याने गावे किंवा वाड्या समाविष्ठ करण्यात अडचण होते. त्यासाठी प्रस्ताव करताना अगोदरच गाव आणि वाडी संख्या अधिक घेऊन तरतूद करण्यात आली.
-बालाजी पुरी, गटविकास अधिकारी खालापूर प. स.
टंचाईग्रस्त गावे व लोकसंख्या
वावोशी 1490
इसांबे 433
उसरोली 595
चिलठण 650
उजळोली 236
खानाव 697
टंचाईग्रस्त वाड्या, लोकसंख्या
चिलठण (बुद्धभूषण नगर) 129
उजळोली (आदिवासीवाडी) 144
खानाव (आदिवासीवाडी) 464
खडई वाडी 142
RamPrahar – The Panvel Daily Paper