Breaking News

भाजप नेते खासदार प्रकाश जावडेकर यांनी कर्जतमध्ये साधला कार्यकर्त्यांशी संवाद

कर्जत ः बातमीदार

केंद्र सरकारच्या सर्व योजना आपल्या भागातील जनसामान्य यांच्यापर्यंत पोहचल्या पाहिजेत याची खबरदारी घेण्याची जबाबदारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आहे, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री, खासदार प्रकाश जावडेकर यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले. कर्जत तालुक्यातील कळंब येथील भाजपच्या बूथ कमिटीच्या बैठकीत प्रकाश जावडेकर बोलत होते.

या वेळी मावळ भाजप कर्जत तालुकाध्यक्ष मंगेश म्हस्कर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, कर्जत तालुका सरचिटणीस संजय कराळे, राजेश भगत, तालुका उपाध्यक्ष सचिन म्हसकर, तालुका चिटणीस जीवन मोडक, अल्पसंख्याक मोर्चाचे तालुकाध्यक्ष फुरकान कुरेशी यांच्यासह बूथ अध्यक्ष उपस्थित होते.

प्रकाश जावडेकर यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात आपल्या पक्षाची ताकद वाढवायची असेल तर सर्वांनी बूथ कमित्या सक्षम केल्या पाहिजेत. त्यानंतर त्या सर्व बूथ प्रमुखांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन भारतीय जनता पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी केंद्रात सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदी सरकारचे निर्णय यांची माहिती दिली पाहिजे. त्याचवेळी त्या निर्णयांची अंमलबजावणी होते किंवा नाही याची माहिती कार्यकर्त्यांनी मतदारांशी संवाद साधून घ्यावी. योजना पोहचत नसतील तर त्यांची जबाबदारी स्वीकारून सामान्य जनतेला मोदी सरकारच्या योजनांचा लाभ द्यावा, यासाठी आवश्यक कागदपत्रे यांची जमवाजमवदेखील बूथ प्रमुखांनी जबाबदारी स्वीकारून करायला हवी असे सूचनादेखील प्रकाश जावडेकर यांनी केली.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply