Breaking News

पारसिक हिलवरील सौंदर्यस्थळ वाचण्यासाठी पर्यावरणवादी सरसावले

नवी मुंबई : बातमीदार

बेलापूरमधील पारसिक हिलच्या रहिवासी बाजूला, रविवारी नवीन स्थळावर खानकामास सुरू झाली आहे. त्यामुळे दरड कोसळण्याचा धोका वाढला असल्याचे मत पारसिक हिलचे निवासी विष्णू जोशी यांनी व्यक्त केले. याविषयी पर्यावरण वाद्यांनी पालिकेकडे तक्रार केली आहे. नॅट कनेक्शन फाउंडेशनने नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगरकडे तक्रार केली असे सोबत ठाण्याचे प्रमुख वन संवर्धक एस. व्ही. रामा राव यांच्यासह मुख्यमंत्र्यांकडेदेखील तक्रार करण्यात आली आहे. पारसिक हिलसारखे सौंदर्यस्थळ वाचण्यासाठी पर्यावरणवादी सरसावले आहेत. पारसिक हिलचा उतार कापण्याची ही दुसरी घटना असल्याचे नॅटकनेक्टचे संचालक बी. एन. कुमार म्हणाले. या आधीदेखील सायन पनवेल महामार्गलगतदेखील विकासकाकडून पारसिक हिल पोखरून सुशोभीकरण करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याविषयी पर्यावरणवाद्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यावर या विषयी तक्रारींना वन विभागाकडे सुपूर्द केले होते. या राज्य सरकारच्या वेळकाढुपणाबाबत पर्यावरणवादी नाराजी व्यक्त करत असतानाच आता हे दुसरे प्रकरण पुढे आले आहे. टेकडीवर होणार्‍या या आघातांमुळे दरडी कोसळू शकतात, ज्याचा टेकडीच्या माथ्यावर असलेल्या इमारतींवर परिणाम होऊ शकतो अशी पारसिक हिल रहिवासी संघटनेने भीती व्यक्त केली आहे. हिलवर अंदाजे 200 भूखंड चिन्हांकीत करण्यात आले असून त्यापैकी जवळपास शंभर भूखंडावर बांधकामे करण्यात आली  आहेत. एकीकडे डोळ्यादेखत उतारावर संपूर्ण  वाढलेल्या झाडांना कापले आणि जाळले जात आहे. ही वृक्ष कत्तल थांबवण्याऐवजी नवी मुंबई महापालिकेतर्फे परसिक हीलच्या दुसर्‍या भागात हजारो रोपांचे वृक्षारोपण केले जात आहे. पालिकेने असलेली झाडे वाचववावीत अशी मागणी नात कनेक्त फाउंडेशनने केली असून; पारसिक हिल वाचवायला जनआंदोलन उभारणार असल्याचे फाउंडेशनचे कुमार यांनी सांगितले.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply