Breaking News

सीकेटी महाविद्यालयात योगासत्र

पनवेल : रामप्रहर वृत

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थ्येच्या खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, न्यु पनवेल (स्वायत्त) महाविद्यालयात मंगळवारी (दि. 21) आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधुन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स विभागाद्वारे योगासत्राचे आयोजन करण्यात आले. या वेळी आर्ट ऑफ लिव्हिंग च्या प्रतिनिधींनी महाविद्यालयातील एन.सी.सी. कॅडेट, एन.एस.एस. स्वयंसेवक, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गास योगाभ्यासाचे प्रशिक्षण प्रदान केले. योगासत्राची सुरुवात ध्यानसाधनेने झाली, यानंतर आर्ट ऑफ लिव्हिंगच्या चमुने प्रशिक्षणार्थींशी हितगुज करीत योगासनांचे महत्त्व विषद करून निरोगी आयुष्यासाठी योगाभ्यास आवश्यक असल्याचे भाष्य केले. महाविद्यालायचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करताना माणसाच्या जीवनातील योगसाधनेचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे उधृत केले. त्यानंतर योगा प्रशिक्षकांच्या निरीक्षण तथा मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी मानेचा, खांद्याचा, कमरेचा आदी सहज-योगाभ्यास केला. याबरोबर ताडासन, वृक्षासन, पवनमुक्तासन, अर्धवक्रासन, त्रिकोणासन, भुजंगासन आदी आसनांचा सराव करून घेतला. श्वसन क्रियेशी संबंधित अनुलोम-विलोम, प्राणायाम आणि कपालभारतीचा सराव करण्यात आला. शवासनाने योगासनांची सांगता करण्यात आली. या वेळी महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. बी. डी. आघाव, कला शाखाप्रमुख प्रो. डॉ. बी. एस. पाटील, वाणिज्य शाखाप्रमुख प्रो. डॉ. एस. बी. यादव, विज्ञान शाखाप्रमुख डॉ. जे. एस. ठाकूर, विविध विभागांचे विभागप्रमुख आदी उपस्थित होते.आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एन.सी.सी. विभागाचे प्रमुख कॅप्टन डॉ. यु. टी. भंडारे आणि सी.टी.ओ. प्रा. नीलिमा तीदार यांनी विशेष परिश्रम घेतले. योग दिनाचे महत्त्व पटवून देण्याकरिता आयोजित विशेष योगाभ्यास सत्राचे आयोजन केल्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि संस्थ्येचे सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले.

Check Also

झालमुरी, एसडी, आरडी आणि सुरांची अवीट मैफल!

‌‘पुरवैय्या‌’ने पनवेलकरांना दिली अविस्मरणीय सांगीतिक पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्तपश्चिम बंगालने हिंदी चित्रपटसृष्टीला अनिल विश्वास, …

Leave a Reply