Breaking News

कर्जतमध्ये असंघटित कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

कर्जत : बातमीदार

राजर्षी शाहू महाराज जयंती दिनानिमित्त आधार असंघटीत जनरल कामगार युनियनच्या वतीने रविवारी (दि. 26) कर्जतमधील रायगड जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात नामवंत डॉक्टरांनी असंघटित कामगारांची आरोग्य तपासणी केली. राजर्षी शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून आधार असंघटीत जनरल कामगार युनियनच्या कार्यालयाचे उद्घाटन अ‍ॅड. मधुकर त्रिभुवन यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर घेण्यात आलेल्या शिबिरात डॉ. नरेंद्र गायकवाड, डॉ. निर्विदा  गायकवाड, डॉ. प्रतिक कांबळी, डॉ. मयूर सरवदे, डॉ. सुनील ढवळे व डॉ. नेहा भालेराव यांनी असंघटीत कामगारांची मोफत आरोग्य तपासणी केली. त्यानंतर अ‍ॅड. त्रिभुवन यांनी कामगार कायदेविषयक मार्गदर्शन केले. युनियनचे अध्यक्ष अ‍ॅड. कैलास मोरे, उपाध्यक्ष हरिचंद्र यादव, सरचिटणीस विद्यानंद ओव्हाळ, खजिनदार  प्रसाद कांबळे, उपखजिनदार डॉ. सुनिल ढवळे, सदस्य शरद गायकवाड, दर्शना पवार, संतोष जाधव, शरद गायकवाड, संजय तिखंडे, द. बा. जाधव, सुनिल सोनावणे, धर्मेंद्र मोरे, अशोक कदम, अनंता गायकवाड, डोंगरे, प्रदीप ढोले, कमलाकर जाधव, विकी जाधव, राजू ढोले, लोकेश यादव, वैभव कांबळे, भगवान जाधव, नगरसेवक उमेश गायकवाड आदि या वेळी उपस्थित होते.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply