कर्जत : बातमीदार
एसआरटी, चारसूत्री लागवड पद्धत तसेच ड्रमसिडरसारख्या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकर्यांनी भात पिकाचे उत्पादन वाढवावे, असे आवाहन कर्जत तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे यांनी उकरूळ येथे केले. कृषी संजीवनी सप्ताहाचे निमिताने कर्जत तालुक्यातील उकरूळ ग्रामपंचायत आणि तालुका कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील मंदिरात शेतकर्यांसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे मार्गदर्शन करीत होत्या. शेतकर्यांना भात पिक लागवडीसाठी शेतकर्यांनी योग्य तंत्रज्ञान आत्मसात करावे, असे त्यांनी या वेळी सांगितले. सरपंच वंदना थोरवे यांनी सर्वांचे स्वागत केले. तालुका कृषी अधिकारी अनुराधा अंधारे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिबिरात 35 शेतकरी सहभागी झाले होते.