पोलादपूर तालुक्यातील सवाद येथे कृषिदिन

पोलादपूर : प्रतिनिधी

हरितक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पोलादपूर तालुका कृषी अधिकारी  व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 1) सवाद येथे कृषिदिनाचे आयोजन करण्यात आले होते.

सवाद ग्रामपंचायतीच्या सरपंच सुरेखा बुडबाडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या  प्रास्ताविकात तालुका कृषी अधिकारी एन. वाय. घरत यांनी कृषिदिन साजरा करण्याबाबतची माहिती सांगून कृषी विभागाच्या फळबाग लागवड, यांत्रिकीकरण, विमा अशा विविध योजनांची माहिती दिली. गटविकास अधिकारी धनंजय जगताप यांनी वृक्षारोपण व पंचायत समितीच्या वतीने राबविण्यात येणार्‍या योजनांविषयी माहिती दिली.

शासनाचा उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी रामचंद्र कदम यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. तसेच आधुनिक शेती करणारे शेतकरी व शेतकरीगटांना प्रशस्तीपत्र व शेती उपयोगी पुस्तके देवून सन्मानित करण्यात आले. या वेळी रामचंद्र कदम यांनी उपस्थित  शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. पंचायत समितीचे माजी  सदस्य यशवंत कासार यांनी शेतकर्‍यांना आधुनिक शेती करण्याबाबत आवाहन केले. स्वच्छता समन्वयक गायकवाड यांनी स्वच्छतेबद्दल मार्गदर्शन केले. सहाय्यक मनोज जाधव यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी केले.

गावातील श्री शंकर मंदिर परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नाखले, कृषी अधिकारी वसावे, विस्तार अधिकारी धिवरे, मंडळ कृषी अधिकारी सूरज पाटील, सामाजिक कार्यकर्ते शौकत तारलेकर, कालवलीचे माजी सरपंच वाय. सी. जाधव, दत्तात्रय उतेकर यांच्यासह विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी पर्यवेक्षक भरत कदम यांनी आभार मानले.

Check Also

Vor die eine Auszahlung denkbar sei, in kraft sein halb wahrscheinlich Umsatzbedingungen

Bares unter anderem Bonusgewinne In welchem ausma? diese Gewinne schenke & amyotrophic lateral sclerosis Bonusgeld …

Leave a Reply