पनवेल ः रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज आणि लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या इमारतीवर लेव्हीकॉन इंडिया सिस्टीम प्रा.लि. कंपनी पनवेलचे प्रोप्रायटर केदार नाडगौंडी यांच्यामार्फत 90 किलो वॅटचे सोलर पॅनल बसविण्यात आले आहेत. या सोलर सिस्टिमचे उद्घाटन ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि.17) करण्यात आले.
या समारंभास ‘रयत’चे सहसचिव (माध्यमिक) बंडू पवार, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य डी.एस. वडजे, डी.बी. पाटील, जोत्स्ना ठाकूर, जनरल बॉडी सदस्य जे.एम. म्हात्रे, जे. जी. जाधव, रायगड विभागीय अधिकारी आर.पी. ठाकूर, वावंजे स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन जी.आर. पाटील, नावडे स्कूल कमिटीचे माजी चेअरमन पंढरीनाथ पाटील, रायगड विभागीय निरीक्षक बाळासाहेब कारंडे, कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे, लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे प्राचार्य अविनाश कुलकर्णी उपस्थित होते.
Check Also
कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड
जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …