Breaking News

केरळ ते मक्का पायी प्रवासासाठी निघालेला सिहाबुद्दीन छोटुरचे माणगावात स्वागत

माणगाव : प्रतिनिधी

मलपुरम (केरळ) ते मक्का मदिना असा पायी प्रवासासाठी निघालेल्या सिहाबुद्दीन छोटुरचे सोमवारी (दि. 4) सकाळी 10 वाजता माणगाव नगरीत आगमान झाल्यानंतर येथील मुस्लिम बांधवांनी त्याचे जोरदार स्वागत केले. सिहाबुद्दीन छोटुर हा 30 वर्षीय तरुण  मलपुरम येथून मक्का मदिनाला जाण्यासाठी 2 जून 2022 रोजी आपल्या घराबाहेर पडला. मलपुरम ते मक्का मदिना हे अंतर आठ हजार 670 किमी  असून, हे अंतर चालत इरान, कुवेत, सौदी अरेबिया असा आठ महिन्यात पुर्ण करून जानेवारी 2023 पर्यंत मक्का मदिना या ठिकाणी पोहचण्याचा मानस त्याने व्यक्त केला. त्याचे सोमवारी माणगावात आगमन झाले. माणगाव, लोणशी, नाणोरे, मोर्बा, निजामपूर आदी गावांसह तालुक्यातील बहुसंख्य मुस्लिम बांधवांनी त्याचे स्वागत केले. त्यानंतर हाजीताहीर मंजिल माणगाव येथे पाऊण तास विश्रांती घेतल्यावर  तो आपल्या पुढील प्रवासासाठी निघाला. त्यावेळी तालुक्यातील अनेक  मुस्लिम बांधवांनी माणगाव नगरपंचायत हद्दीपर्यंत त्याच्या सोबत चालत जाऊन त्याला पुढील प्रवासासाठी मुबारक बात (शुभेच्छा) दिल्या.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply