Breaking News

सांगुर्ली गावात रोटरीतर्फे उपक्रम

खारघर : रामप्रहर वृत्त

रोटरी क्लब ऑफ खारघर मिड टाऊनतर्फे पनवेलच्या सांगुर्ली गावात शनिवारी (दि. 9) दोन सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.

या गावाच्या जिल्ला परिषद शाळा मध्ये 50 गरीब पोरी पोरांना मुफ्त वह्या पुस्तकं वाटप करण्यात आले, तसेच 100 एक झाडे लावण्यात व वाटण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्यांना एक एक झाड देऊन त्यांना त्या झाडाचे नाव व त्यांचा स्वत:चे नाव टाकून लावायला सांगितले.

या वेळी रोटरी खारघर मिड टाऊनतर्फे क्लबचे अध्यक्ष रोटरियन प्रशांत कालान, सर्व्हिस प्रोजेक्ट डायरेक्टर राजेश झिरपे, सेक्रेटरी अनामिका श्रीवास्तव व इतर रोटारियन उपस्थित होते. शाळेचे हेडमास्तर माधवी राजेंद्र दिवेकर, मुलांचे पालक, गावातले काही मान्यवरही उपस्थित होते.

Check Also

खोपोली येथील विविध समाज घटकांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खोपोली : प्रतिनिधीभाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा पनवेलचे कार्यसम्राट …

Leave a Reply