नवी दिल्ली : गरिबी कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न करणार्या 10 देशांमध्ये भारताचा समावेश असल्याची माहिती मल्टीडायमेंशनल पॉवर्टी इंडेक्स 2019 (एमपी)च्या रिपोर्टमध्ये समोर आली आहे. हा रिपोर्ट ऑक्सफोर्ड पॉवर्टी अॅण्ड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह आणि युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रॅम यांनी मिळून तयार केला आहे. रिपोर्टनुसार, भारताने आपल्या येथील गरिबी 55.1 टक्क्यांवरून 27.9 टक्के म्हणजे जवळपास अर्ध्यावर आणली आहे. जवळपास 27.1 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात आले. याआधी गरिबांची संख्या 64 कोटी होती, जी आता 36.9 कोटींवर आली आहे. यामध्ये झारखंड राज्यात सर्वात वेगाने गरिबी कमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. गरिबी कमी करण्यासाठी मुख्यत्वे संपत्ती, स्वयंपाक इंधन, स्वच्छता आणि पोषण यांचा समावेश आहे. (सविस्तर वृत्त पान 2 वर..)
Check Also
महात्मा फुले महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी परेश ठाकूर
पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य …