Breaking News

पनवेलमधील काळुंद्रे येथे नागरिकांना हायमास्टची सुविधा

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल महापालिका क्षेत्रात विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. त्या अंतर्गत काळुंद्रे येथे माजी उपमहापौर चारुशीला घरत यांच्या नगरसेवक निधीतून हायमास्ट उभारण्यात आले आहे. या हायमास्टचे लोकार्पण माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 8) झाले.
लोकार्पण समारंभास माजी सरपंच स्नेहलता म्हात्रे, ज्येेष्ठ कार्यकर्ते शंकर म्हात्रे, विलास म्हसकर, विशाल घरत, कमलाकर घरत, बादल म्हात्रे, जगन चिखलेकर, मनीष घरत, संतोष घरत, परेश म्हसकर यांच्यासह पदाधिकारी, कार्ययर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
पनवेल महापालिकेमार्फत नागरिकांना विविध सोयीसुविधा देण्याचे काम अविरत सुरू आहे. त्यानुसार काळुंद्रे येथील जि. प. शाळेच्या आवारात माजी उपमहापौर चारुशीला घरत यांच्या नगरसेवक निधीमधून हाय मास्टदिवे बसविण्यात आले आहे. या दिव्यांचे लोकार्पण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे तेथील नागरिकांना ही सुविधा उपलब्ध झाली आहे.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply