परेश ठाकूर यांनी घेतले सपत्नीक दर्शन
पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप दक्षिण भारतीय सेल कामोठेच्या वतीने वरमहालक्ष्मी पूजा शुक्रवारी (दि. 26) आयोजित केली होती. या पुजेचे संयोजक तथा कामोठे मंडळ उपाध्यक्ष सूजीत पुजारी यांच्या वतीने सरोवर एन्क्स येथे ही पूजा झाली. या पुजेला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि त्यांच्या पत्नी अर्चना परेश ठाकूर यांनी भेट देऊन दर्शन घेतले.
या वेळी भाजपचे कामोठे मंडळ अध्यक्ष रवी जोशी, भाजप दक्षिण भारतीय सेल संयोजक माधुरी श्रीनिवास कोडुरु, महिला मोर्चा अध्यक्षा वनिता पाटील, महिला रायगड जिल्हा संयोजक विद्या तामखेडे, कामोठे सरचिटणीस सुशील शर्मा, युवा नेते हॅप्पी सिंग, कामोठे युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, भाऊ भगत, कामोठे तुलू कन्नडा वेल्फेअर असोसिएशनचे बीराज कोठीयान, कामोठे सहसंयोजक संजीव नाथ, के. के. थेवर, कामोठे सोशल मीडिया सहसंयोजिका सविना बंगेरा, गणेश शेट्टी, कर्नाटक संघ अध्यक्ष धनंजय शेट्टी, सरोजिनी पुजारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी रमेश नायर यांची कळंबोली रायगड भाजप भारतीय दूरसंचार विभाग सहकार समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केले.