Breaking News

श्रीवर्धन-बोर्ली राज्य महामार्गावर दोन प्रवासी निवारा शेडचे भूमिपूजन

म्हसळा : रामप्रहर वृत्त
भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य कृष्णा कोबनाक यांच्या पाठपुराव्यामुळे आमदार रमेश पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून श्रीवर्धन-बोर्ली राज्य महामार्गावरील नागलोली व भरडोली येथे एसटी बस थांबे बांधण्यात येणार आहेत. सुमारे पाच लाख रुपये खर्चाच्या या बस थांब्यांच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी (दि. 2) भाजपचे श्रीवर्धन तालुका अध्यक्ष प्रशांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रवाशांचे ऊन, पावसापासून संरक्षण करण्यासाठी श्रीवर्धन-बोर्ली राज्य महामार्गावर नागलोली व भरडोली येथे बस थांबे उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य कृष्णा कोबनाक यांनी पाठपुरावा केला होता. आमदार रमेश पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून या बस थांब्यासाठी सुमारे पाच लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शुक्रवारी  या बस थांब्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी भाजपचे श्रीवर्धन तालुका सरचिटणीस गजानन निंबरे, आदेश पाटील, म्हसळा तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर, सरचिटणीस समीर धनसे, मनोहर जाधव, आतिफ उभारे, कोकण विकास आघाडी श्रीवर्धन तालुका सहसंपर्क प्रमुख कृष्णा भोंबडे, संतोष पारधी, नवनीत तोडणकर, समाज सेवेशी तत्पर संघटनेचे अध्यक्ष राज मोहित यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

करंजा बंदराच्या विकासाला १८० कोटींचे भक्कम पाठबळ!

मच्छीमार बांधवांचे हित आणि उरणच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य ः आमदार महेश बालदी उरण : रामप्रहर …

Leave a Reply