Breaking News

कामोठ्यात ज्येष्ठ नागरिक सत्कार, नेत्र तपासणी शिबिर

-आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती; युवा नेते हॅप्पी सिंग यांच्या वाढदिवसाचे औचित्य

पनवेल ः रामप्रहर वृत्त

भाजपचे युवा नेते हॅप्पी सिंग यांचा वाढदिवस रविवारी (दि. 4) सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. वाढदिवसानिमित्त कामोठे सेक्टर 6 येथे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, दंत व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 150 ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत हॅप्पी सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, माजी नगरसेवक राजू शर्मा, विकास घरत, गोपीनाथ भगत, विजय चिपळेकर, माजी नगरसेविका पुष्पा कुत्तरवडे, युवा मोर्चा कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, आर. जी. म्हात्रे, प्रदिप भगत, हरजिंदर कौर, नवी मुंबई गुरुद्वारा प्रसिडेंट जसपाल सिंग, सल्लंखन सिंग, प्रतिक पोटे, अजय मोरे, सुभाष दिलपे, अमीर जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Check Also

उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!

पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे …

Leave a Reply