पनवेल : रामप्रहर वृत्त
आयुष्यामध्ये व्यक्तिगत क्षेत्रामध्ये पुढे जात असताना समाजाचा एक चांगला घटक, एक जबाबदार नागरिक होण्यासाठी एकविरा युवक मित्र मंडळाचा आदर्श घ्या, असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर केले. ते पनवेल तक्का येथील एकविरा युवक मित्र मंडळाच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात बोलत होते.
एकविरा युवक मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्या अंतर्गत या वर्षी शैक्षणिक वर्ष 2021-22मध्ये एसएससी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास भाजप पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, अर्थतज्ञ जे. डी. तांडेल, समद मुकादम, मंडळाचे अध्यक्ष संदीप खुटकर, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, अजय बहिरा, भाजप नेते मनोहर मुंबईकर, संजय बहिरा, युवा नेते प्रतीक बहिरा, विनायक पगडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.

RamPrahar – The Panvel Daily Paper