Breaking News

ऐन गणेशोत्सवात पनवेलमध्ये बत्ती गूल

परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत महावितरण कार्यालयाला घेराव

पनवेल : रामप्रहर वृत्त
ऐन गणेशोत्सवात रोज पनवेल शहरातील वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे शहरातील गणेशोत्सव मंडळे तसेच नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्येबाबत जाब विचारण्यासाठी महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. 7) महावितरणच्या कार्यालयाला घेराव घालण्यात आला. या वेळी अधिकार्‍यांना जाब विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आठवडाभरात वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.
पनवेल शहरात बत्ती गूल होण्याचे प्रमाण वाढले आहे. दिवसा, रात्री कधीही वीजपुरवठा खंडित होत असतो. जीर्ण विद्युतवाहिन्या, डीपीमुळे सातत्याने विजेचा लपंडाव सुरू असतो. परिणामी नागरिक त्रस्त झाले असून ऐन गणेशोत्सवातही महावितरणचा भोंगळ कारभार सुरू असल्याने प्रचंड आक्रोश पाहायला मिळत आहे. या समस्येबाबत पनवेलमधील महावितरण कार्यालय येथे घेराव आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह माजी नगरसेवक व भाजपचे शहर सरचिटणीस नितीन पाटील, माजी नगरसेवक अनिल भगत, मुकीद काजी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, शिवसेना शिंदे गट पनवेल महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, भाजप प्रभाग 19चे अध्यक्ष पवन सोनी, यतीन देशमुख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
या वेळी परेश ठाकूर यांनी विद्युत समस्येबाबत महावितरणचे अधिकारी श्री. बोके यांच्याकडे विचारणा केली तसेच वीजपुरवठा सुरळीत करून नागरिकांची गैरसोय दूर करा असे सुनावले. अधिकारी श्री. बोके यांनी आठवडाभरात वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करा

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त पिंपरी-चिंचवडकर खासदार श्रीरंग बारणे …

Leave a Reply